Mission-Vision


दृष्टिकोन

प्रस्तावित “नवभारत गुरुकुलम्” चे ध्येय असे एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थान उभारणे आहे, जेथे केवळ शैक्षणिक उत्कृष्टता नव्हे तर संस्कारशील, जबाबदार, नवोन्मेषी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असे जागतिक नागरिक घडवले जातील.

आमचा उद्देश अशा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे आहे, जे भारतीय मूल्ये व परंपरांचा भान ठेवून, जागतिक दृष्टीकोनासह विकसित भारत घडविण्यात सक्रिय भूमिका निभावतील..

ध्येय

आमचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत, त्यांना समग्र व समावेशक शिक्षण उपलब्ध करून देणे आहे. प्रस्तावित शिक्षणप्रणाली भारतीय संस्कृती, जीवनमूल्ये आणि परंपरा यांवर आधारित असेल.

२१व्या शतकातील प्रगत तंत्रज्ञान व STEAM शिक्षण पद्धतीचा वापर करून शिक्षण अधिक सोपे, आकर्षक व व्यवहार्य केले जाईल.