श्रीमती नरसम्मा हिरय्या शैक्षणिक ट्रस्ट द्वारा
महाराष्ट्र शासनाकडून २४ जून २०२६ रोजी अधिकृत परवानगी
अमरावती येथे स्थापित होणारी ही ट्रस्ट-आधारित शैक्षणिक संस्था भारतीय गुरुकुल तत्त्वज्ञान, विद्या भारती मार्गदर्शन आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 यांच्या समन्वयातून निर्माण होत आहे.
आमच्या अर्जाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र शासन ट्रस्टकडून इच्छापत्र (LoI) मिळाल्यानंतर, आमच्या नवभारत गुरुकुलम् या शाळेला महाराष्ट्र शासनाकडून २४ जून २०२६ रोजी अधिकृत परवानगी मिळाली आहे. तथापि, सद्य शैक्षणिक सत्र सुरू झाले असल्याने, ट्रस्टने शाळा २०२७–२८ शैक्षणिक सत्रपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नरसम्मा हिरय्या शैक्षणिक परिसर
श्रीमती नरसम्मा हिरैय्या शैक्षणिक न्यास हा महाराष्ट्र सार्वजनिक न्यास अधिनियम, १९५० अंतर्गत विधिवत नोंदणीकृत सार्वजनिक न्यास आहे. स्थानिक सुप्रसिद्ध व्यावसायिक मन्नेवार कुटुंबाच्या कुटुंबप्रमुख, स्वर्गीय श्रीमती नरसम्मा हिरैय्या मन्नेवार यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात शैक्षणिक कार्यासाठी मौल्यवान जमीन दान करून या न्यासाची स्थापना केली.
व्यावसायिक कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीचा समृद्ध अनुभव असलेले विश्वस्त मंडळ न्यासाचे कार्य पारदर्शक, नियोजनबद्ध व समाजाभिमुख पद्धतीने संचालित करते.
सध्या न्यासाच्या अंतर्गत शिशुवाटीका, सरस्वती विद्यालय तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये (UG, PG व संशोधन) यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्याचबरोबर नवभारत गुरुकुलम या प्रस्तावित शाळेच्या बांधकामास सुरुवात करण्यात आलेली आहे.
न्यासाच्या प्रत्येक उपक्रमामागे राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार करणे, भारतीय संस्कृतीचा स्वाभिमान वृद्धिंगत करणे आणि समाजघडणीत सकारात्मक योगदान देणे हा मूलभूत उद्देश आहे. हा न्यास आयकर अधिनियमाच्या कलम ८०जी अंतर्गत तसेच कंपनी कायद्यातील सीएसआर नियम, २०१४ अंतर्गत विधिवत नोंदणीकृत आहे. (अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा)
भारतीय मूल्ये, आधुनिक शिक्षण आणि संस्कारयुक्त व्यक्तिमत्त्व विकास - हे तीन स्तंभ आमच्या शाळेच्या संकल्पनेचा पाया आहेत. गुरुकुल परंपरा आणि CBSE अभ्यासक्रम यांचा अद्वितीय समन्वय साधून आम्ही भविष्याच्या भारताचे नेतृत्व करणारी पिढी तयार करत आहोत.
विषयांवर क्लिक करून सविस्तर माहिती पाहा / Click below links for details
भारतीय मूल्यांवर आधारित, आधुनिक ज्ञान-विज्ञानाने सुसज्ज, जागतिक नागरिक तयार करणे.
दीर्घकालीन उद्दिष्ट:
सभ्यतागत नेतृत्व निर्माण - भारताच्या सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करत जागतिक स्तरावर योगदान देणारे नागरिक.
मातृभाषा-आधारित शिक्षण, पंचकोश विकास, STEAM शिक्षण आणि भारतीय संस्कृती यांचा समन्वय.
प्रस्तावित शाळा भारतीय मूल्याधिष्ठित गुरुकुल परंपरा आणि आधुनिक CBSE अभ्यासक्रम यांचा समन्वय साधणारी, भविष्योन्मुख व विद्यार्थी-केंद्रित शाळा म्हणून विकसित केली जाणार आहे. शाळेच्या पायाभूत सुविधा विकासाचा आराखडा हा CBSE मान्यता निकष, राष्ट्रीय बांधकाम संहिता (NBC) तसेच शैक्षणिक कार्यक्षमतेच्या सर्वोत्तम पद्धती यांचा विचार करून तयार करण्यात आला आहे.
अधिक माहितीमोठी प्रतिमा पाहण्यासाठी प्रतिमेवर क्लिक करा
नवभारत गुरुकुलम् च्या विकासात आपल्या सहाय्याची आवश्यता आहे. आपल्या देणगीचे स्वागत आहे.
* All donations are eligible for 80G tax exemption.
आपण देणगी देऊ इच्छित असल्यास, कृपया खालील फॉर्म भरा. आमचे प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधतील.
आम्ही तुमच्याशी लवकरच संपर्क साधू.